कॅलिफोर्नियात शीख आणि मुस्लिमांना धार्मिक स्वातंत्र्य देणारे कायदे

वॉशिंग्टन: मुस्लीम आणि शीख समाजाच्या व्यक्तींबाबत कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी धार्मिक भेदभाव केला जाऊ नये आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याला बाधा येऊ नये; यासाठी कॅलिफोर्निया राज्यात दोन नवीन कायदे करण्यात आले. शिखांबाबत गैरसमज पसरू नयेत यासाठी शीख पंथाविषयीच्या माहितीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे.

कॅलिफोर्नियामध्ये या वर्षात धार्मिक विद्वेषाच्या सुमारे ५०० घटना घडल्या. या प्रकारांना रोखण्यासाठी राज्याने शीख आणि मुसलमानांना पगडी, दाढी, टोपी आणि बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा कायदा संमत केला आहे. त्याचप्रमाणे आणखी एका कायद्याने शालेय अभ्यासक्रमात शीख पंथाची माहिती देण्याची सक्ती करण्यात आली आहे.

या कायद्यांच्या मसुद्यावर सह्या करून राज्याचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी त्यावर नुकतेच शिक्का मोर्तब केले. शिक्षणाच्या माध्यमातून बंधुभाव वाढविणार्‍या या कायद्याचे शीख आणि मुस्लीम समाजाकडून स्वागत करण्यात आले.

Leave a Comment