हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी पोलिसांवर ठपका

औरंगाबाद: कन्नडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पोलिसांनी केलेले आरोप खुल्ताबाद न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे दिलासा मिळालेल्या जाधव यांनी पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून केला जावा; अशी मागणीही त्यांनी केली.

हर्षवर्धन जाधव यांनीच पोलिसांना मारहाण केली. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा तोडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला; असे आरोप पोलिसांनी केले होते. न्यायालयाने हे आरोप मान्य न करता पोलिसांनीच जाधव यांना मारहाण केल्याचे मान्य केले.

Leave a Comment