’भूत रिटर्न’चे जबरदस्त पोस्टर

प्रेक्षकांना घाबरविण्याचे काम बॉलिवुडचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना चांगल्या प्रकारे जमते. आतापर्यंत अनेक चित्रपटांद्वारे ते प्रेक्षकांना घाबरविण्यात यशस्वी झाले आहेत. आता त्यांचा भूत रिटर्न्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे तो त्यांच्या अत्यंत खतरनाक पोस्टरमुळे… अत्यंत भयानक असे पोस्टर सर्वांना भयभीत करीत आहे.

या पोस्टरमध्ये एका लहान मुलीचा फोटो अशा प्रकारे दाखविण्यात आला आहे की, तुमचे डोके चकरावून जाईल. रामूच्या या नव्या ३ चित्रपटाचे नुकतेच पोस्टरचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. तोंडातून रक्त येत असलेल्या या मुलीच्या फोटोमध्ये अशा प्रकारे इफेक्ट टाकला आहे की, त्यामुळे तो साधा फोटो अत्यंत भयाण वाटतो.

पोस्टरमधील मुलीच्या डोळ्यांमध्ये पाहिले तर दृष्टीभ्रम होऊन  चार डोळे आणि दोन नाके दिसतात. रामू या पोस्टरद्वारे प्रेक्षकांना २००३मध्ये रिलिज झालेल्या भूतचा सिक्वलची झलक दाखवत आहेत.

Leave a Comment