फेसबुक बनावट खाते समाप्त करणार

सोशल नेटवकिंर्ग साइट फेसबुकने एक अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला ज्याने बनावट फेसबुक वापरकर्त्यांचा शोध लावून त्यांना समाप्त केले जाऊ शकेल. कंपनीतील एक वरिष्ठ अधिकार्यामने सांगितले की, ओळखीचा दुरुपयोग रोखण्यासाठी याला ह्यूज एफर्ट नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

भारतातील फेसबुकचे बिजनेस मॅनेजर पवन वर्मा यांनीही या बाबीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, या अंतर्गत जर फेसबुकला एखाद्या अकाउंट धारक बनावट असण्याची शंका झाली तर पूर्वी तो याचे सत्यापन करेल. संशय येण्याचे अनेक कारणे असु शकतात. पूर्ण नाव न देऊन फक्त जातीयुक्त नाव असणे, आपल्या छायाचित्राऐवजी एखाद्या अभिनेत्याचे किंवा व्यंगचित्र असणे, मित्रांची पर्याप्त संख्या नसल्यावर ते अकाउंट संशयास्पद मानले जाऊ शकते. बनावट खाते आमच्या कंपनीच्या प्रतिष्ठेसाठी नुकसानदायी आहेत. याला पाहून कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

Leave a Comment