इराकचे उपराष्ट्रपती हाशेमी यांना फाशीची शिक्षा

इराकच्या एका न्यायालयाने देशाचे फरार उपराष्ट्रपती तारिक अल हाशेमी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.शिया मुस्लिम आणि सुरक्षा दलास लक्ष्य करून लोकांची हत्या करणारे एक पथक चालविल्याप्रकरणी न्यायालयाने हाशेमी यांना दोषी ठरविले. सुन्नी संप्रदायाशी संबंधित अल हाशेमी या वर्षीच्या सुरूवातील देश सोडून फरार झाले असून ते आता तुर्कीत निर्वासित म्हणून राहत आहेत.याप्रकरणी देशातील शिया, सुन्नी आणि कुर्द आघाडी सरकार समोर एक राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

इराकच्या शिया सरकारमध्ये हाशेमी सुन्नी संप्रदायातील सर्वात वरिष्ठ नेते होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते.

इराक सरकारने १९ डिसेंबर, २०११ रोजी त्यांच्या अटकेचे वारंट बजावले होते. त्याच्या एक दिवसआधीच अमेरिकन सैन्य देश सोडून गेले होते.हाशेमी आधी देशाच्या उत्तर कुर्द भागात गेले आणि पुन्हा कतर मार्गे ते तुर्कीला गेले.

Leave a Comment