उंदीर, झुरळांनी लावला ५० लाखांचा चुना!

सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात एक भारतीय भोजन देणाऱ्या टेक-अवे रेस्टॉरंटवर स्वच्छता नियमाचे पालन न केल्यामुळे सुमारे एक लाख डॉलरचा दंड आकारला गेला आहे. कारण आरोग्य अधिकार्‍यांना किंग्स क्रॉस भागात स्थित या रेस्टॉरंमध्ये झुरळे व मेलेले उंदीर आढळले.
स्थानिक न्यायालयात रेस्टॉरंटचा  मालक आरआर असोसिएट्सने वर्ष २०११ मध्ये सातपासून अकरा डिसेंबरदरम्यान फूड स्टँडर्ड कोडचे पालन न करण्याचा आरोप स्वीकारला. रेस्टॉरंटवर विविध कलमा अंतर्गंत एकुण साडे ९७ हजार डॉलरचा दंड ठोठावला होता.

एक ग्राहकाच्या तक्रारीवर स्थानिक आरोग्य अधिकारी रेस्टारंटचे निरीक्षण करण्यासाठी गेले जेथे त्यानां सर्विस एरिया व कपाटात उंदीराच्या लेंड्या व कचराकुंडीमागे मेलेला उंदीर आढळला.

अधिकार्‍यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना रेस्टारंटची भिंत, फरशी व काउंटरवर झुरळ चालताना दिसले. त्यांनी असेही सांगितले की, कपाटात खालच्या भागात धुळ व माती जमा झालेली होती आणि याचखाली खाद्य सामग्री ठेवली होती. दरम्यान रेस्टॉरंटची सत्ता दुसर्‍यांच्या हाती गेली आहे. सिडनीच्या काउंसिलने न्यायाधिशांना रेस्टॉरंटवर मोठा दंड लावण्याची मागणी केली होती ज्यामुळे सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात टाकणार्‍या हॉटेल-रेस्टॉरंट मालकांना धडा मिळेल.

Leave a Comment