प्रफुल्ल पटेल सर्वात श्रीमंत मंत्री

नवी दिल्ली: केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री ठरले आहेत. शहरी विकास मंत्री कमलनाथ यांना ‘ओव्हर टे’ करून त्यांनी हे स्थान पटकावले आहे.

संपुआ सरकारमध्ये १०० कोटी क्लबमध्ये पटेल आणि कमलनाथ हे दोनच मंत्री आहेत. यापूर्वी कमलनाथ हे पटेल यांच्या पुढे होते. मात्र कमलनाथ यांना पटेल यांनी आता मागे टाकले आहे. पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा यांच्या नावावर ११९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या संपत्तीत मागील वर्षीपेक्षा या वर्षी ५ कोटी रुपयांची भर पडली आहे. पटेल यांच्याकडे साडे तीन कोटी रुपयांचे दागिने आणि मुंबईत वारली येथे ३ सदनिका आहेत. त्याची किंमत ८० कोटी रुपये आहे.

Leave a Comment