कोळसाकांड- ५ आजी, माजी मुख्यमंत्री सीबीआयच्या रडारवर

नवी दिल्ली: कोळसा कांड प्रकरणी दोन माजी तर तीन विद्यमान मुख्यमंत्री केंद्रीय अन्वेषण विभागाच्या रडारवर असून लवकरंच त्यांची चौकशी होण्याची शक्यता सीबीआयच्या सूत्रांनी व्यक्त केली.

कोळसा खाण घोटाळा कॅगने उघडकीला आणल्यावर सीबीआयने सन २००६ ते २००९ या काळात खाजगी कंपन्यांना देण्यात आलेल्या कोळसा खाण परवान्यांची चौकशी सुरू केली आहे. हे परवाने राज्यांच्या शिफारसीने देण्यात आले असल्याने ५ आजी माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि मधु कोडा हे सीबीआयच्या रडारवर आहेत. या आजी, माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या कंपन्यांना कोळसा खाणींचे परवाने देण्याचे शिफारस केली त्यापैकी काही कंपन्या या परवान्यासाठी अपात्र असल्याचे निदर्शनास आले आहे.