दिग्विजय सिंह ठार वेडे: उद्धव ठाकरे

दिग्विजय सिंह ठार वेडे असून त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही; अशा शब्दात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली.

सिंह यांनी ठाकरे कुटुंबीय मूळचे बिहारी असल्याचे विधान काही दिवसापूर्वी केले होते. या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पिता प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संदर्भही दिला. मात्र उद्धव ठाकरे यांनी सिंह यांचा हा दावा खोटा असल्याचे सांगितले.

ठाकरे कुटुंबीय बिहार येथील मगध या ठिकाणाहून मध्यप्रदेशातील भोपाळ येथे स्थलांतरित झाले आणि त्यानंतर ते चितोडगड मार्गे महाराष्ट्रात आले; असा उल्लेख प्रबोधनकारांच्या पुस्तकात असल्याचे स्पष्टीकरण सिंह यांनी दिले होते. मात्र ही माहिती वेगळ्याच ठाकरे कुटुंबांबद्दल असून आमचे पूर्वज नाशिकजवळच्या धोडप किल्ल्याचे किल्लेदार होते; असा दावा उद्धव यांनी केला.

दिग्विजय सिंह हे मतांचे राजकारण करीत असून इतिहासाशी त्यांना काही देणे घेणे नाही; अशी टीकाही उद्धव यांनी केली. त्यांनी आमच्या कुळाचे मूळ शोधण्याऐवजी आपल्या लोकांबाबत माहिती घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Comment