झुकेरबर्ग विकणार नाही फेसबुकचे शेअर

सॅन फ्रान्सिस्को दि.६ – किमान १ वर्षभर तरी फेसबुकचे शेअर न विकण्याची शपथ कंपनीचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने घेतली आहे. त्याच्याबरोबरच कंपनीचे संचालक मार्क अँडरसन आणि डोनाल्ड ग्रॅहम यांनीही त्यांच्या वाट्याचे शेअर न विकण्याचा निर्णय घेतला आहे असे समजते. या घोषणेमुळे मंगळवारी फेसबुकचा सर्वात कमी किमतीवर गेलेला शेअर बुधवारी सकाळी ५ टक्कयांनी सुधारला आहे.

फेसबुकच्या आयपीओत मे मध्ये ३८ डॉलर्स किमतीला हा शेअर विकला गेला होता. त्यानंतर मंगळवारी प्रथमच हा शेअर घसरून १७.७३ या निचांकी पातळीला पोहोचला. मार्कच्या घोषणेनंतर हा शेअर पाच टक्कयांनी वाढला. मार्ककडे कंपनीचे ५०४ दशलक्ष शेअर असून तो या शेअर्सची विक्री नोव्हेंबरपासून करू शकणार आहे. तसेच कंपनीचे ६९२ दशलक्ष शेअर्स विक्रीसाठी पात्र आहेत. त्यामुळे या शेअरमध्येच मार्कनेही आपले शेअर बाजारात विक्रीसाठी आणले तर शेअरची किंमत अधिकच कोसळेल अशी भीती आहे.

कंपनीचे एम्लॉईज शेअर २९ आक्टोबरला खुल्या बाजारात येणार आहेत. अपेक्षेपेक्षा तीन आठवडे अगोदरच हे शेअर बाजारात येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. कंपनीचा तिसर्‍या तिमाहीचा अहवाल आक्टोबर २३ ला जाहीर करण्यात येत आहे. कंपनीचा महसूल अपेक्षेपेक्षा खूपच घटल्याने शेअर घसरत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

Leave a Comment