चीन आठ वर्षात सोडणार आठ उपग्रह

बीजिंग: जमीन आणि समुद्राची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी चीन आठ वर्षात आठ उपग्रह अवकाशात सोडणार असून त्याबद्दलची योजना तयार झाली आहे; अशी माहिती चीनचे नॅशनल सॅटेलाईट ओशन अ‍ॅप्लिकेशन सर्व्हिसेसचे संचालक झियांग जिंगवेयी यांनी दिली.

या योजनेनुसार चार उपग्रह समुद्रातील रंगांचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात येतील तर इतर चार उपग्रह सागर आणि भूभागावर नजर ठेवतील. सध्या तीन उपग्रहांद्वारे चीन सागरी सीमा आणि दियावू, हुआंगायान या बेटावर नजर ठेऊन आहे. या यंत्रणेद्वारे सुमारे तीन लाख चौरस किलोमीटर सागरी हद्दीवर नजर ठेवता येते. मात्र एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी ही यंत्रणा पुरेशी नाही. त्यामुळे नवीन यंत्रणेमुळे या क्षमतेत मोठी भर पडेल; असा विश्वास सागरी माहिती विभागाचे अधिकारी जिया डेग्वीन यांनी व्यक्त केला.

Leave a Comment