सर्वाधिक काळ स्पेसवॉकचा सुनीताचा विक्रम

ह्युस्टन: अवकाश स्थानकाच्या दुरुस्तीसाठी बुधवारी स्पेस वॉक करणार्‍या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी सर्वाधिक काळ स्पेस वॉक करणारी महिला अंतराळवीर बनण्याचा विक्रम केला.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दुरुस्तीसाठी सुनीता यांनी त्यांचे सहकारी जपानचे अंतराळवीर अकीहीको होशिडे यांच्या साथीने बुधवारी स्पेस वॉक केला. यापूर्वी पेगी व्हीटसन या ३९ तास ४६ मिनिटे स्पेस वॉकसाठी अंतराळ यानाच्या बाहेर होत्या. त्यांचा विक्रम मोडीत काढत सुनीता यांनी ४४ तास २ मिनिटे स्पेस वॉक करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

एका आठवड्यात दोन वेळा स्पेस वॉक करण्याचा एक आगळा विक्रमही सुनीता आणि अकीहीको यांच्या नावावर नामा झाला आहे.