नवी दिल्ली: केंद्रीय अन्वेषण विभागाने कोळसा खाण परवाने घेतलेल्या कंपन्यांवर घातलेल्या धाडी फिक्स्ड असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय अन्वेषण विभागाने कोळसा खाण परवाने घेतलेल्या कंपन्यांवर घातलेल्या धाडी फिक्स्ड असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
कोळसा खाण घोटाळ्याचा कॅगने पर्दाफाश केल्यावर सीबीआयने कोळसा खाण परवाने घेतलेल्या कंपन्यांवर धाडी घातल्या होत्या. मात्र या धाडी पडणार असल्याची पूर्वकल्पना या कंपन्यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पुरावे नष्ट केल्याचीच शक्यता आहे; असा आरोप केजरीवाल यांनी ट्विटरवर केला.
धाड पडलेल्या एका कंपनीतील वरिष्ठ अधिकार्याने इमेलवर आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. या धाडी हा फक्त देखावाच होता काय; असा सवालही केजरीवाल यांनी केला.
सीबीआयने मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे.