आशा भोसले यांनी राजवर साधला निशाणा

मुंबई: भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुरळीत करण्यासाठी क्रिकेट डिप्लोमसीचा अवलंब होणार असल्याची चर्चा आहे. त्यावेळी विक्रमवीर सचिन तेंडुलकर पाक संघाविरुद्ध मैदानात उतरेल; तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असेल हे मला बघायचे आहे; अशा शब्दात विख्यात गायिका आशा भोसले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सूरक्षेत्र या कार्यक्रमात सहभागी होऊन पाकिस्तानी कलाकारांचे कौतुक करण्याबद्दल ठाकरे यांनी भोसले यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यात ‘अतिथी देवो भव’ आणि ‘पैसा देवो भव’ या उद्गारांचे वाग्युद्धही झडले. त्यानंतर संयम बाळगलेल्या भोसले यांनी आता मात्र क्रिकेटच्या मैदानाद्वारे ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

Leave a Comment