संजय मांजरेकरकडून सचिनची पाठराखण

मुंबई: न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत अपयशी ठरला म्हणून सचिन तेंडुलकरने निवृत्त व्हावे हा विचार अयोग्य असून आगामी दक्षिण आफ्रिका दौर्यात सचिनची भारतीय संघाला आवश्यकता आहे; असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने व्यक्त केले.

न्यूझीलंड विरुद्ध कसोटीत तीन वेळा त्रिफळा उडाल्याने सचिनवर टीका होत आहे. त्याने निवृत्त व्हावे अशी मागणीही केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मांजरेकर याने सचिनची पाठराखण केली आहे.

धावा काढण्यासाठी प्रत्येक फलंदाजाला झगडावे लागे. धावांसाठी झगडणारा सचिन हा एकमेव फलंदाज नाही. एका मालिकेत अपयशी ठरल्याने त्याने निवृत्त व्हावे असे मानणे योग्य नाही; असे मत मांजरेकर याने व्यक्त केले.

Leave a Comment