
रशियातील सेंट पिटसबर्ग येथे अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज याचे स्मारक लवकरच उभारले जाणार आहे. या स्मारकाची कल्पना सुचवावी यासाठी एक स्पर्धाच येथे जाहीर करण्यात आली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता या स्पर्धकातून निवडल्या गेलेल्या २५ जणांच्या स्मारकाच्या प्रतिकृतींचे एक प्रदर्शन शहरात आयोजित करण्यात आले असून ते ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनातील प्रतिकृतींमधून कोणती निवडायची याचा निर्णय सेंट पिटसबर्ग येथील माहिती तंत्रज्ञान तज्ञ ज्युरी घेणार आहेत तसेच त्यासाठी ऑनलाईन व्होटींगही करता येणार आहे असे प्रोजेक्ट ऑरगनायझरकडून सांगण्यात आले आहे.