भाजप सत्तेवर आल्यास तेलंगण राज्याची स्थापना

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास तीन महिन्याच्या आत स्वतंत्र तेलंगण राज्याला मंजुरी दिली जाईल; असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी दिले.

स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर धरणे आंदोलन करणार्या तेलंगण राज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची स्वराज यांनी बुधवारी भेट घेतली.

यावेळी स्वराज यांनी भाजप सत्तेवर आल्यास स्वतंत्र तेलंगण स्थापन करेल; अशी ग्वाही दिली. स्वतंत्र तेलंगणाला पाठींबा देऊन दिलेले आश्वासन न पाळण्याबद्दल स्वराज यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीवर टीका केली. यापुढे तेलंगणाच्या जनतेने संपुआवर विश्वास ठेऊ नये; असे आवाहन त्यांनी केले. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांनीही आंदोलकांची भेट घेतली.