अँग्री बर्डस नंतर येताहेत बॅड पिगीज

हेलसिंकी – अँग्री बर्डस या अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मोबाईल अॅपनंतर बर्डच्या निर्मात्याने म्हणजे रोव्हीयो याने बॅड पिग्ज या नव्या गेमची निर्मिती केली असून २७ सप्टेंबरला हा गेम लाँच केला जात आहे.

अँग्री बर्डस हे जगात सर्वाधिक डाऊनलोड झालेले मोबाईल अॅप असून मे मध्ये त्याचे १ अब्ज डाऊनलोड झाले आहेत. त्यातून कंपनीने ४८ दशलक्ष युरो म्हणजेच ६० दशलक्ष डॉलर्सचा नफा मिळविला आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन रोव्हीयोने बॅड पिग्जची निर्मिती केली असून यात खेळणारा स्वतःच पिग म्हणून खेळू शकणार आहे.

अँग्री बर्डसमध्ये किल्ल्यातील हिरव्या पिग्जचा संदर्भ आला आहेच. हिरव्या डोळ्यांनी या संपन्न जगाचा शोध घेणारी ही बॅड पिग्ज ही जगातील दुसर्‍या नंबरचे लोकप्रिय कॅरेक्टर बनतील असा त्याला विश्वास आहे. हा गेम आयओएस, अँड्राईड व मॅकवर उपलब्ध करून दिला जात असून नंतर तो विंडोज फोन, विंडो ८ वरही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Leave a Comment