स्वीडीश सरकारच्या वेबसाईट हॅक

स्टॉकहोम दि. ४-  स्वीडीश सरकारच्या व देशातील अन्य महत्वाच्या संस्थांच्या वेबसाईट हॅकर्सने हॅक केल्यामुळे जॅम झाल्या आहेत. त्यात सरकारी तसेच संरक्षण दलाच्या आणि स्वीडीश संस्थांच्या वेबसाईटसचा समावेश आहे. याची जबाबदारी असांजेच्या समर्थकांनी स्वीकारली असल्याचे ट्वीटरवर हॅकर्सनी जाहीर केले आहे.

विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याच्या हस्तांतरणाची मागणी स्वीडीश सरकारने लंडनकडे केली आहे. असांजे सध्या लंडनमध्येच इक्वेडोरच्या दूतावासात आश्रयास असून त्याने तेथे जून १९ पासून आश्रय घेतला आहे. असांजेपासून दूर रहा असा इशारा या हॅकर्सनी दिला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

स्वीडीश लष्करातील डिजिटल मिडीया प्रमुख निकलस इंग्लुंड यांनी या हॅकींगमागे नक्की कोण आहे याचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र अचानक या महत्त्वाच्या वेबसाईटवर बोगस ट्राफिक वाढला आणि त्या जॅम झाल्या असे सांगून ते म्हणाले ज्या अनोळखी गटाने हे काम केले आहे त्यांचा तपास घेण्यात येत आहे. असांजे स्वीडन सरकाला लैगिंक गुन्हयासंदर्भात हवा आहे आणि म्हणून त्याचे हस्तांतरण करण्यात यावे अशी विनंती ब्रिटनला करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment