राज ठाकरे यांची उद्धवकडूनही पाठराखण

मुंबई दि. ४ – बिहारी नागरिकांबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर सर्वच राजकीय पक्षांकडून उलटसुलट वक्तव्ये केली जात असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिबा दिल्यानंतर आता कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही राज यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांची पाठराखण केली आहे.

मंगळवारी या संदर्भात बोलताना उद्धव यांनी मुंबई पोलिसांना बिहारमध्ये लपलेल्या मुंबईतील दंगलप्रकरणातील संशयिताला पकडण्यासाठी बिहार पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असेल तर मुंबईत राहू इच्छिणार्‍या बिहारींसाठी परमिट सिस्टीम सुरू केली पाहिजे यावर जोर दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधूनही हीच भूमिका त्यांनी मांडली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या बाबत निष्कारण ढवळाढवळ करू नये असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे. सहा वर्षांनंतर राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येत असल्याचे चित्र त्यामुळे राजकारणाच्या पटलावर दिसत असून त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल असा अंदाजही वर्तविला जात आहे.

Leave a Comment