ई-मेल पासून दूर राहा

लॉस एंजिलीस, दि. ४ – सर्वसामान्य माणूस किमान एका मिनीटात दोन ईमेल्स करतो. पण समजा एखाद्या दिवशी तुम्ही झटपट इमेल केला नाही तर तुमची कार्यक्षमता वाढते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे.

हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी अमेरिकन आर्मीच्या १३ कर्मचार्‍यांची निवड केली. त्यासाठी त्यांची पाच सुत्रे वापरली. या १३ जणांना काही दिवस त्यांची दिवसाची नियोजित कामे करायला सांगितली. त्यानंतर पुढच्या पाच दिवसांमध्ये त्यांना ईमेल्स करणे जाणूनबुजून टाळायला सांगितले. पहिले दोन दिवस त्यांना नेटपासून दूर राहण्याचा त्रास झाला. पण पाचव्या दिवशी मात्र संशोधकांना असे लक्षात आले की ही १३ जणांची कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. संशोधकांनी त्यांच्या ह्रदयाचे ठोके मोजले. त्यानुसार त्यांच्या ह्रदयाची स्पंदने ही धीम्या गतीने सुरु होती. याचा अर्थ असा की ईमेल न केल्यामुळे ते जास्त ’स्ट्रेस फ्री’ झाले होते. या १३ जणांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संवादकौशल्यातही वाढ झाली होती. अनेक जणांशी त्यांना थेट संवाद साधता आला.

Leave a Comment