येत्या काही दिवसांत संगणक आणि मोबाइल फोन हॅकिंगपासून दिलासा मिळू शकतो. एका संशोधनानुसार हे शक्य आहे. संशोधकांच्या एका टीमने एक असे सिलिकॉन चिप विकासित केले आहे ज्यामुळे दहा वर्षांत मोठ्याप्रमाणावर क्वांटम कंप्यूटर बनू शकतील. यामुळे मोबाइल फोन आणि खासगी संगणकातील सामग्री हॅक केली जाऊ शकणार नाही, असा दावा संशोधकांनी केला.
सोमवारी स्कॉटलंडच्या ऐबरडीन शहरात एक मोठा विज्ञान समारंभ सुरू होण्याआधी ही घोषणा करण्यात आली.
क्वांटम कंप्यूटर बनविण्याची प्रक्रिया अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. मात्र यामुळे अत्यंत जटील समस्या सोडविल्या जाऊ शकतील आणि तेदेखील सध्याच्या संगणकापेक्षा जास्त वेगाने हे करता येईल असा दावा केला जात आहे.
चिप बनविणार्याज टीममध्ये ब्रिटनचे शहर ब्रिस्टलशिवाय हैरियट-वॉट यूनिवर्सिटीच्या संशोधकांचाही समावेश आहे. त्यांच्या मते, त्यांनी जी सिलिकॉन चिप बनविली आहे, तिने क्वांटम चिपचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन करण्याचा मार्ग मोकळा होईल व भविष्यात या प्रक्रियेद्वारे किंवा चिपद्वारे मोबाइल फोनची हॅकिंग किंवा कोड तोडणे अशक्य होईल.