धोनीसोबत शूटमध्ये रणबीर बीझी

गेल्या काही दिवसापासून रणबीर कपूर बर्फी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यातच भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत तो एका जाहिरातीत झळकणार आहे. सध्या या जाहिरातीच्या शूटमध्ये तो व्यस्त असलयाचे समजते. या जाहिरातीतून रणबीर कपूर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाला आगामी काळात होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्याचे काम करणार आहे.

रणबीर कपूर क्रिकेटचा मोठा फॅन आहे. त्याला भारतीय संघातील धोनी, विराट कोहली आणि सुरेश रैना हे खेळाडू खूप आवडतात. याबाबत बोलताना रणबीर कपूर म्हणाला, ‘ क्रिकेट हा असा खेळ आहे की, त्यामध्ये सतत काहीना ना काही बदल होत गेला आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. हा सामना छोटा असला तरी त्यामध्ये खूप काही एक्सयटिंग आहे. या प्रकारामुळे क्रिकेटचे मूळ स्वरूपाच बदलले आहे. पेप्सीची सद्याची जाहिरात खेळ आणि देशाच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे. या जाहिरातीमुळे मला धोनीसोबत काम करण्यची संधी मिळाली आहे. त्यामुळे या कामावर खूप खुष असून सध्या इनजॉय करीत आहे.’

या जाहिरातीबाबत धोन म्हणाला, ‘ ट्वेन्टी-२० क्रिकेटने खेळाचे स्वरूप बदलले आहे. सध्या हा खेळ खुपच फास्ट आणि थ्रिलींग फॉरमटमध्ये खेळला जात आहे. गेल्या वर्षीही जाहिरातीतून पेप्सीसाठी काम केले होते. यावेळी मात्र कन्सेप्टमध्ये थोडा फार बदल करण्यात आला आहे. या जाहिरातीचे शूट करताना खुपच मजा आली.’

Leave a Comment