नवी दिल्ली: कोळसाकांड प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच कंपन्यांवर प्राथमिक तपास अहवाल दाखल केला आहे. या कंपन्यांसह अज्ञात शासकीय अधिकाऱ्यांवर फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचण्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

सीबीआयने कोळसा खाण घोटाळा प्रकरणी दिल्ली, मुंबई, नागपूर, धनबाद, हैदराबाद आणि पाटणा या ठिकाणी धाडी टाकल्या असून आणखी काही ठिकाणी धाडी घातल्या जाणार आहेत; अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. या धाडीत मिळालेल्या माहितीनुसार विन्नी आयर्न अँड स्टील, जेएएस इन्फ्रास्ट्रक्चर, नवभारत स्टील, जेएलडी यवतमाळ आणि एएमआर आयर्न अँड स्टील या पाच कंपन्यांसह अज्ञात शासकीय अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कोळसा खाण परवाने प्राप्त करणार्या कंपन्यांची खरोखरच या खाणीतून कोळसा उत्पादन करण्याची क्षमता आहे काय आणि या कंपन्यांनी कोळसा खाण परवाने मिळविताना दिलेली माहिती आणि आकडेवारी योग्य आहे काय; याची पडताळणी सीबीआय करीत आहे.
कोळसा खाण परवाने देण्याच्या प्रक्रियेशी सन २००५ ते सन २००९ या कालावधीत संबंधित असलेल्या शासकीय अधिकर्यांची चौकशीही सीबीआय करीत आहे.
कोळसा उत्पादन सुरू करण्यास विलंब करणार्या आणि सन २००५ मध्ये परवाने मिळूनही अद्याप उत्पादन सुरू न करू शकलेल्या कंपन्यांची मंत्रिगटामार्फतही चौकशी सुरू असून या समितीचा दि. १५ सप्टेंबर रोजी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांचे परवाने रद्द होऊ शकतात.