’शिरीन फरहाद की निकल पडी’

चित्रपट : शिरीन फरहाद की तो निकल पडी
फरहाद पस्ताकियाने वयाची ४५शी गाठली आहे. मात्र अद्यापही फरहाद अविवाहित आहे. फरहादची तारुण्यापासूनच लग्न करायची इच्छा होती, मात्र तरीदेखील कोणतीच मुलगी त्याच्याबरोबर लग्न करण्यास का उत्सुक नव्हती हे समजणे जरा अवघड आहे. फरहादच्या वयाकडे बघता तो दिसायलाही काही वाईट नाही.

उंचपुरा, हॅण्डसम, मृदुभाषी आणि श्रीमंत कुटुंबातील हा फरहाद आहे. चित्रपटाच्या पटकथेवरुन फरहाद ब्रा अॅण्ड पॅण्टीच्या दुकानात सेल्समन असल्यामुळे त्यांचे लग्न झाले नसल्याचे आपल्या लक्षात येते. हीच एक गोष्ट त्यांच्या लग्न न होण्यामागे कारणीभूत ठरली. फरहादच्या आईचे त्याच्यावर खूप प्रेम आहे. फरहादच्या आईने त्यांच्यासाठी योग्य वधू शोधण्यासाठी जणू कंबरच कसली आहे. त्याच्या आईने अद्यापही आशा सोडलेली नाहीये. अजून काही काळ मुलीची वाट बघत बसलास तर केवळ घटस्फोटीत किंवा विधवा मुलीशीच लग्न करण्याची वेळ तुझ्यावर येईल अशी चेतावनी आईने फरहादला दिली आहे.

फरहाद पारसी आहे. पारसी लोक दहाव्या शतकात ईरानहून भारतात स्थायिक झाले होते. येथे स्थायिक झाल्यानंतरही पारसी समाजाने आपल्या जुन्या समृद्ध परंपरा जपून ठेवल्या आहेत आणि ते आपल्या समाजातच लग्न करण्यावर भर देतात. आता स्वाभाविकच आहे, फरहादलाही लग्न करुन सेटल व्हायचे असेल तर त्याला पारसी मुलीशीच लग्न करावे लागेल. मात्र आता अशी मुलगी मिळणार तरी कुठे ? या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे. अनेक पारसी मुली घराच्या चार भींतीतच राहणे पसंत करतात आणि जास्तीत जास्त त्या जीममध्ये दिसतात. पारसी लोकांना त्यांच्या खास सेन्स ऑफ ह्युमर आणि त्यांच्या जुन्या मर्सीडीज बेंजमुळेही ओळखले जाऊ शकते.

अखेर फरहादला त्याची शिरीन भेटते. शिरीनचे वयसुद्धा जवळपास फरहाद एवढेच आहे. शिरीन एका पारसी ट*स्टमध्ये कामाला आहे. पारसी मुलगी भेटल्यामुळे फरहादला आनंदाने उड्याच मारायला हव्या. विशेष म्हणजे फरहाद हेच करतो. फरहादची आईसुद्धा सुटकेचा श्वास घेऊ शकते. मात्र सगळे काही सुरळीत घडून आले तर मग मजा ती काय राहणार ? मुलाच्या आईला मुलगी मुळीच पसंत पडत नाही. पण का ? कारण शिरीनने त्यांच्या घरातील एक वॉटर टँक काढून घेतला होता.

अभिनेता बोमन इराणी यांनी पारसी फरहादची भूमिका साकारली आहे. या धाटणीच्या मात्र याहीपेक्षा चांगल्या भूमिका त्यांनी यापूर्वी वठवल्या आहेत. चरित्र अभिनेत्याला केंद्रस्थानी ठेऊन चित्रपट तयार करण्यात आला असल्यामुळे कदाचित बोमन या चित्रपटात काम करण्यास तयार झाले असावे. मात्र तरीदेखील प्रेक्षक आणखी एका कारणामुळे चित्रपट बघायला थिएटरमध्ये आले होते. ते कारण म्हणजे फराह खान. फराह सुद्धा तिचा कझीन फरहान अख्तरप्रमाणे अर्धी पारसी आहे. फराहने शिरीनची भूमिका साकारली आहे.

फराह स्वतः दिग्दर्शिका आहे. मात्र भारतातील एका उत्कृष्ट अभिनेता बोमन इराणीसोबत काम करताना ती खूपच अवघडल्यासारखी वाटत होती. आता या दोघांच्या चित्रपटातील केमेस्ट्रीविषयी बोलायचे झाले तर कदाचित केमेस्ट्रीच्या पुस्तकाविषयी बोलणेच इंट्रेस्टिंग ठरेल.

निश्चितच हा सिनेमा शिरीन फरहाद या दोन विलक्षण प्रेमी जोडप्यापासून प्रेरित नाहीये. फक्त त्यांच्या नावावर चित्रपटाचे शिर्षक ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट पारसी लोकांपासूनच प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे. आज जगात पारसी लोकांची संख्या फारच कमी झालेली आहे. भारतातील फारच कमी शहरात पारसी लोकांची वसाहत आहे. देशाची शोबिज इंडस्ट्री असलेल्या मुंबईत पारसी लोक राहतात. म्हणूनच तर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये या समुदायातील लोक दिसतात.

गेल्या काही वर्षात पारसी लोकांना केंद्रबिंदू ठेऊन काही चित्रपट तयार झाले आहेत. त्या सिनेमांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. उदाहरणार्थ, होमी अदजानियाचा ’बीईंग सायरस’ (२००५), सूनी तारापुरवालाचा ’लिटिल जिजू’ (२००९), राजेश मापुस्कर यांचा ’फेरारी की सवारी’ (२०१२) या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. मात्र जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर शिरीन फरहादची घालमेल बघून थिएटरबाहेर पडतो तेव्हा आपल्या डोक्यात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे ’’डीकरा, व्हाट वाज धिस ?’’

स्टार कास्ट ः बोमन इराणी, फराह खान, कविन दवे, डेजी इरानी
दिग्दर्शक ः बेला सहगल
निर्माताः संजय लीला भन्साळी, सुनील ए, लुल्ला
म्युझीक ः जीत गांगुली

Leave a Comment