आता सेलफोन करणार भाषांतरही

नवी दिल्ली: भाषांतराचे काम करण्यासाठी आता भाषा तज्ज्ञांकडे जाण्याची आवश्यकता नाही की जाड-जूड डिक्शनरीत डोके खुपसून बसण्याची गरज नाही. खिशातून काढलेला मोबाईल फोन आता हे कामही करून देणार आहे.

मोबाईल उत्पादक कंपनी एल. जी.ने ऑप्टीमस एल-९ हा नवा स्मार्ट फोन बाजारात आणला आहे. ४.७ इंच स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये अँड्रॉईड ४.० सॅंडविच ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. यात एक गिगाहर्ट्झ ड्युएल कोअर प्रोसेसर, १ जीबी रॅम, ५ मेगापिक्सल कॅमेरा, आयपीएस डिस्प्ले या सुविधा आहेत.

मात्र या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात उपलब्ध असणारे क्यू ट्रान्सलेटर हे अ‍ॅप्लिकेशन! या सुविधेमुळे एखादा शब्द, वाक्य किंवा परिच्छेद तब्बल ४४ भाषांमध्ये भाषांतरित करता येतो.

या मोडेलबरोबरच एल. जी. ऑप्टीमस- जी हा आणखी एक स्मार्ट फोनही बाजारात आणला आहे.

Leave a Comment