सेबीची वेबसाईट आता भारतीय भाषेत

नवी दिल्ली: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणार्‍या सेबी या नियामक संस्थेची वेबसाईट आता इंग्रजीबरोबरच १३ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार असून त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना भांडवली बाजाराची अद्ययावत माहिती मिळणे शक्य होणार आहे.

सेबीने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयानुसार सेबीची वेबसाईट आता हिंदी, मराठी, मल्याळम, आसामी, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी, काश्मिरी, तामिळ, तेलुगु, ओरिया आणि उर्दू या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. या वेबसाईटवर लिखित मजकुरासह ऑडीओ आणि व्हीडीओ स्वरूपात माहिती उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या वेबसाईटद्वारे सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि शेअर बाजाराची माहिती करून घेण्याची इच्छा असणार्‍या नवीन लोकांना उपयुक्त माहिती उपलब्ध होईल.