एम.बी.ए. बँकिग

बँकिगच्या क्षेत्रात मध्यंतरीच्या काळात नोकरभरतीची प्रक्रिया जवळजवळ थांबलेली होती. कारण बँकांचे व्यवहार जुन्या पद्धतीने सुरू होते आणि त्यांच्यामध्ये संगणकीकरण करण्याची गरज होती. काळाची ही गरज हेरून बँकांनी संगणकीकरण सुरू केले.

त्यामुळे कमी लोकांत अधिक कामे व्हायला लागली. परिणामी बँकांमध्ये अधिक जे लोक भरती केलेले होते त्यांना संगणकाचे शिक्षण दिले गेले आणि त्यामुळे नवे कर्मचारी नेमण्याची गरज राहिली नाही. कालमानानुसार बँकांचे व्यवहार वाढले, पैशाची उलाढाल वाढली आणि बँकांच्या मार्फत व्यवहार करण्याची लोकांची सवय वाढत गेली, बँकांचे काम वाढले, त्यांचे व्यवहार मोठे झाले, परंतु ही सारी वाढलेली कामे करण्यासाठी नवे कर्मचारी नेमण्याच्या ऐवजी ती सारी कामे संगणकावर सोपवण्यात आली.

असे असले तरी आता बँकांचे व्यवहार खूपच वाढले आहे. संगणक आणि आहेत तेच कर्मचारी यांच्या जोरावर ही कामे आता होत नाहीत. म्हणून नवी भरती करण्याकडे ओढा आहे आणि या पुढच्या काळामध्ये बँकांमध्ये होणारी भरती ही विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुण उमेदवारा ंतूनच होणार आहे. शेवटी बँकांचे संगणकी करण केले तरी माणसे लागतातच.

म्हणून ती भरती करताना आता एम.बी.ए. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी राहणार आहे. म्हणूनच एम.बी.ए.चे शिक्षण देणार्‍या काही संस्थांनी एम.बी.ए. बँकिंग असे स्पेशलायझेशन निर्माण केले असून हे शिक्षण घेणार्‍यांना बँकांमध्ये नोकर्‍या मिळण्याची शक्यता आहे. अर्थात केवळ एम.बी.ए.मध्येच ही सोय आहे असे नाही तर काही संस्थांनी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम निर्माण केले आहेत.

हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एंटरप्राईज या संस्थेमध्ये असा एक अभ्यासक्रम आहे. मात्र तो केवळ बँकिग पुरता मर्यादित नाही तर डिप्लोमा इन बँकिग, इन्शुरन्स अॅन्ड फिनान्शियल सव्र्हिसेस असा व्यापक आहे. म्हणजे हा अभ्यासक्रम करणार्‍यांना बँकिग शिवाय अन्य दोन क्षेत्रात सुद्धा काम करता येते. नोएडा येथील एमिटी स्कूल ऑफ इन्शुरन्स, बँकिग अॅन्ड अॅक्च्युरियल सायन्सेस् या संस्थेनेही बँकिग आणि इन्शुरन्स या विषयाचे स्पेशलायझेन असलेला एम.बी.ए. चा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे.

Leave a Comment