सैनिक आता स्मार्टफोनने शत्रूचा नायनाट करतील

वॉशिंग्टन -सैनिकांना शत्रूंचा शोध घेणे व त्यांच्यावर नेम साधण्यासाठी अनेक उपकरणाची गरज पडणार नाही. आता एक स्मार्टफोन सॉफ्टवेयरने हे सर्व काम केले जाऊ शकतील. याने फक्त दूरवरील एखाद्या वस्तुचा शोध घेतला जाणार नव्हे तर त्याची लांबी व गतीचा सरळ अंदाज लावला जाऊ शकतो.

हे स्मार्टफोन सैनिकांसह गोल्फ खेळाडू व जीव वैज्ञानिकांसाठीही सहाय्यक सिद्ध होतील. गोल्फ खेळाडू याने गोल्फ चेंडूच्या अंतर मोजू शकतील तसेच जीव वैज्ञानिक दुर्मिळ जंतुंचे संधान करू शकतील. यूनिवर्सिटी ऑफ मिसोरीद्वारे विकसित या सॉफ्टवेयरची क्षमता अजून मर्यादित आहे परंतु ग्लोबल पोजीशनिंग सिस्टम (जीपीएस), बॅटरी व कॅमरेच्या क्षमतेत वाढ करण्यासह हे सॉफ्टवेयर खुप फायदेशीर सिद्ध होईल.

सध्या सैनिकांना युद्धभूमीत अंतर मापक, दिशासूचक, जीपीएस व अनेक इतर उपकरण सोबत ठेवावे लागते. हवाई हल्ल्यापूर्वी या सर्व उपकरणाच्या मदतीने शत्रूचा शोध घेतला जातो. नवीन सॉफ्टवेयरमुळे आता हे सर्व उपकरण एक स्मार्टफोनमध्ये सामावले जाईल.

युद्धभूमीहून परतल्यानंतर त्या सॉफ्टवेयरच्या उपयोगाने सैनिक आपल्या मुलांच्या शाळांवरही नजर ठेवु शकतील. जर एखादा हल्लेखोर त्यांच्या मुलांवर चुकीचे काम करीत असेल तर सॉफ्टवेयरने बनवलेल्या व्हीडियो फुटेजच्या माध्यमाने त्याले धरले जाऊ शकते.

Leave a Comment