नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला त्याचा आदर्श असलेल्या लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी वाढत्या वयाची जाणीव करून दिली. वाढत्या वयामुळे सचिनचे फुटवर्क पूर्वी इतके सफाईदार राहिले नसल्याचे गावसकर यांनी बंगळूरू कसोटीचे समालोचन करताना नमूद केले.
सचिनच्या निवृत्तीवरून सतत चर्चा आणि वाद होत असतात. मात्र सचिनने नुकतेच कॅस्ट्रॉल क्रिकेट पुरस्कारांचे वितरण झाल्यावर जोपर्यंत खेळण्यात आनंद आहे तोपर्यंत खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र खुद्द लिटील मास्टरने सचिनच्या फुटवर्कवर टिपण्णी करून जणू सचिनला निवृत्त होण्याचा सल्लाच दिला आहे.