माझा पक्ष हा महाराष्ट्रासाठीच – राज ठाकरे

राज ठाकरे यांनी आज आपल्या छोट्या भाषणात नेहमीच्या स्टाईलने आर. आर. पाटील, सीएसटीतील हिंसाचार, बाहेरुन येणारे लोंढे आणि सूरक्षेत्र कार्यक्रमात सहभागी झालेल्या आशाताई यांच्यावर सडकून टीका केली.

ते म्हणाले, माझ्या पक्षाला महाराष्ट्र सोडून वाढण्यास रस नाही. महाराष्ट्राचा विकास हाच आमच्या पक्षाचा अजेंडा आहे. पण आमच्या राज्यातही बाहेरचे फुकटे येतच आहेत. हे सगळे फुकटे उत्तरप्रदेश आणि बिहारमधून येत असतात. बरं हे येतात ते येतात आणि इथेच गुन्हे करतात. मी पूर्वीच सांगितले आहे आणि आताही तेच सांगतो आहे की, सीएसटी हिंसाचार हा स्थानिकांनी नव्हे; तर बाहेरच्या अल्पसंख्याकांनी केला आहे. स्थानिक हिंसाचार करणार नाही, कारण त्याला इथेच राहायचे असते. तो कशाला असल्या भानगडीत पडेल?

मुंबई पोलिसांनी गुन्हेगारांना बिहारमध्ये येऊनविनापरवानगी अटक केली म्हणून हात लावाल तर इथल्याप्रत्येक बिहारी घुसखोरांना महाराष्ट्रातून हाकलून लावू , अशारोखठोक भाषेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारच्यामुख्य सचिवांना तंबी दिली आहे . तसेच बिहारचे मुख्यमंत्रीनितिश कुमार आणि दिल्लीतील नेते आता गप्प का , असा सवालही केला आहे .

राज्यात, देशात अनेक कलाकार असताना, त्यांना मोठे न करता आशाताई तुम्ही पाकिस्तानी कलाकारांसोबत का सहभागी होता. जो देश तुमचे लचके तोडतोय, तुमच्यावर टपून बसलाय, अशा देशातील कलाकारांना तुम्ही अतिथी देवो भव असे म्हणता. हे ‘अतिथी देवो भव’ की ‘पैसा देवो भव’ हे तरी एकदा रोखठोक सांगा, असे वक्तव्य त्यांनी केले. आशाताई तुम्ही सावरकरांबद्दल खासगीत बोलता आणि त्यांच्याच विचारांना तिलांजली देतो हे बरं नव्हे. आता तुम्ही याविषयी रोखठोक भूमिका घ्या, असेही राज ठाकरे म्हणाले.

माझ्या पक्षाचे नाव महाराष्ट्र निर्माण सेना आहे. म्हणजे मी महाराष्ट्राच्या बाऊंड्रीतच राहणार आहे, असे राज यांनी सांगितले. तसेच दिल्लीत जे जातात ते फुकट गेले, त्यामुळे आपण भले आपला महाराष्ट्र भला, अशा शब्दात त्यांनी दिल्लीतील नेत्यांना टोला लगावला.

Leave a Comment