किम क्लायस्टर्स टेनिसमधून निवृत्ती घेणार

न्यूयॉर्क: बेल्जियमची टेनिसपटू किम क्लायस्टर्स हिने अमेरिकन ओपन स्पर्धेतील पराभवानंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

किमने चार वेळा ग्रेंड स्लेम विजेतेपदाला गवसणी घातली आहे. आपल्या चार वर्षाच्या मुलीसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देता यावा म्हणून आपण निवृत्ती घेत असल्याचे स्पष्टीकरण किमने दिले.

बुधवारी खालेल्या महिला एकेरी स्पर्धेत ब्रिटनच्या लॉरा रॉबस्टनकडून किमला ७-६ (४), ७-६ (५) असे पराभूत व्हावे लागले. दुहेरीचे सामने संपल्यावर किम एकेरी आणि दुहेरी टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. किमने यापूर्वी सन २००७ मध्ये निवृत्ती घेऊन अडीच वर्षानंतर टेनिसमध्ये पुनरागमन केले. ‘कमबॅक सुपर मॉम’ असेच नामाभिधान तिला टेनिस विश्वात लाभले.

Leave a Comment