हेलिकॉप्टर्सच्या धडकीत आठ ठार

अहमदाबाद: सरावादरम्यान हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टर्सची हवेत धडक होऊन नऊ वैमानिक ठार झाले. आणखी दोघे जण हेलिकॉप्टर्सच्या सांगाड्यात जखमी अवस्थेत आढळून आले.

हवाई दलातील एमआय १७ या हेलिकॉप्टर्सनी गुरुवारी सरावासाठी हवाई तळावरून उड्डाण केले. जामनगर हवाई तळाजवळ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आकाशात या दोन हेलिकॉप्टर्सची धडक झाली. धडक झाल्यावर दोन्ही हेलिकॉप्टर्स जमिनीवर कोसळली. त्यापैकी एका हेलिकॉप्टरने जमिनीवर कोसळण्यापूर्वीच पेट घेतला आणि या दोन्ही हेलिकॉप्टर्समधील नऊ वैमानिक जागीच ठार झाले. दोघा जखमी वैमानिकांवर उपचार सुरू आहेत.