राज ठाकरे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश

नवी दिल्ली: रेल्वे भरतीच्या वेळी परप्रांतीय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने दिले आहेत.

रेल्वे भरतीसाठी बिहारमधून आलेल्या उमेदवारांना सन २००८ मध्ये कल्याण येथे मारहाण झाली होती. या मारहाणीबाबत बिहार न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी दंगेखोरांना चिथावणी दिल्याचा आरोप ठाकरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र या खटल्याची सुनावणी बिहारच्या बाहेर करावी अशी विनंती राज ठाकरे यांच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली. ही विनंती मान्य करून हा खटला दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला.

या खटल्याच्या सुनावणीसाठी राज ठाकरे यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहावे असे आदेश तीस हजारी न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Comment