आवाज पाठविण्याच्या चाचणीत क्युरिऑसिटी पास

केलिफोर्निया: नासाने मंगळाच्या अभ्यासासाठी पाठविलेल्या क्युरिऑसिटी या अंतराळ यानाने आवाज पृथ्वीवर पाठविण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

क्युरिसिटी हे यान आवाज मंगळावरून पृथ्वीवर पाठवू शकेल काय याची खातरजमा करण्यासाठी नासाचे प्रमुख चार्ल्स बोल्डेन यांनी क्युरिसिटी मंगळावर उतरल्याबद्दल आपल्या सहकार्‍यांचे अभिनंदन केल्याचा आवाज रेकोर्ड करून तो रेडिओ लहरींद्वारे क्युरिऑसिटीकडे पाठविला होता. तो आवाज ग्रहण करून या यानाने तो परत पृथ्वीवर पाठविला आहे.

मंगळावर कोणता आवाज क्युरिऑसिटीने ग्रहण केल्यास ते यान हा आवाज पृथ्वीवर पाठवू शकेल; हे या चाचणीतून सिद्ध झाले आहे.

Leave a Comment