अरूप पटनाईक यांच्यावर अॅजिओप्लास्टी

मुंबई दि.३०- मुंबईचे माजी पोलिस कमिशनर अरूप पटनाईक यांना काल छातीत वेदना होऊ लागल्याने द.मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे तपासण्यांनंतर त्यांच्यावर अॅजिओग्राफी आणि अॅजिओप्लास्टी करण्यात आल्याचे जसलोकच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. छातीत वेदना होत असल्याने त्यांचा इसीजी काढण्यात आला तेव्हा त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे आढळले. त्यामुळे त्वरीत निर्णय घेऊन त्यांच्यावर अॅजिओप्लास्टी करण्यात आली .पटनायक अजूनही आयसीयूमध्येच असून आणखी तीनचार दिवस तरी त्यांना रूग्णालयात राहावे लागणार आहे.

मुंबईत ११ ऑगस्टला झालेल्या दंग्याचा ठपका पटनायक यांच्यावर ठेवण्यात आला होता. या दंग्यात २ जण ठार तर ४० हून अधिक जखमी झाले होते आणि जखमींत पोलिसांची संख्याच मोठी होती. कांही राजकीय पक्षांनी त्यांच्या बदलीचा आग्रह धरल्याने त्यांची बढतीवर गेल्या आठवड्यातच डायरेक्टर जनरल ऑफ सिक्युरिटी या पदावर बदली करण्यात आली. त्याचा ताण पटनायक यांच्यावर आल्याची चर्चा मुंबई पोलिस दलात सुरू आहे मात्र यापूर्वी १९९९ सालीही त्यांना असा त्रास झाला होता असा खुलासा करण्यात आला आहे.

हृदयरोगतज्ञ डॉ.ए.बी.मेहता यांच्या देखरेखीखाली पटनायक यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment