नवी दिल्ली: मुंबईवरील झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब आणखी ६ महिने जिवंत राहिला तरी खूप झाले; अशी त्याच्या प्रशिक्षक आणि २६/११ च्या हल्ल्याचा पडद्यामागील सूत्रधार अबू जुन्दाल याची भावना आहे.

कसबाला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्का मोर्तब केले असून त्याचा ‘अफजल गुरु ‘ न करता त्याला लवकरात लवकर फाशी द्यावे; अशी मागणी समाजाच्या विविध स्तरातून होत आहे. मात्र कसबाची सध्याची अवस्था बघता तो फार तर ६ महिने जिवंत राहू शकतो; असा अबूचा कयास आहे.
काही दिवसापूर्वीच २६/११ च्या हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाबाबत मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी कुंदाल आणि कसाब यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात एकमेकांसमोर आणले होते.