
नवी दिल्ली, २९ ऑगस्ट-एअरहॉस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि हरियाणाचा माजी गृहमंत्री गोपाल कांडा प्ले बॉय होता. तो नेहमी वेगवेगळ्या तरुणींसोबत दिसायचा. विशेष म्हणजे अरुणा चठ्ठा ही त्याला तरुणी पुरवत होती, असा खळबळजनक आरोप एमडीएलआरची माजी एअरहॉस्टेस आणि बॉलिवूड अभिनेत्री नूपुर मेहताने केला आहे.
’मिलेनियम पोस्ट’ वेबसाइटशी बोलताना नूपरने सांगितले की, कांडाला सुंदर मुली आवडत होत्या. त्यामुळे एमडीएलआर आणि गोव्यातील कसिनोमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणींची भरती केली जात होती. एक-एक करत कांडा कंपनीच्या तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवत होता. विशेष म्हणजे सध्या अटकेत असलेली आरोपी अरुणा चठ्ठा ही कांडाच्या मर्जीतली होती. कांडा सांगायचा तसेच ती करत होती.
सुंदर तरुणींना नोकरी देतानाच एक कॉनत्रक्त केले जात होते. ऑफिस काम झाल्यानंतर त्यांनी गोपाल कांडा याला रिपोर्टिंग करायचे, असा सूचना वजा आदेशाच त्यांना अरुणा देत होती. गीतिकासोबतही अशाच प्रकारचे कॉनत्रक्त करण्यात आले होते. या कॉनत्रक्तचा फायदा घेऊन कांडाने गीतिकाचा वापर करून घेतला. कांडा आपल्या कंपनीतील तरुणींना महागडे गिफ्ट देऊन आपलेसे करत होता. कांडाने अंकिताला गोव्यात कोट्यवधींची प्रॉपर्टी घेऊन दिली होती, असेही नूपूरने सांगितले.