जपानी महिला रोबो रेस्टॉरंट सुरू

औद्योगिक रोबो वापरात जगभरात आघाडीवर असलेल्या जपानने महिला रोबो असलेले रेस्टॉरंट सुरू केले असून हे रेस्टॉरंट ओपनिंगपासूनच गर्दी खेचू लागले असल्याचे समजते. जपानच्या काबुकिचो प्रांतातील शिंजुक शहरात हे हाय टेक रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे.

या रेस्टॉरंटमधील महिला रोबो ग्राहकांचे आपल्या मनमोहक अदाकारींनी चांगलेच मनोरंजन करत असून पारंपारिक जपानी वाद्यांबरोबरच त्या परदेशी गाण्यांच्या तालावरही थिरकत आहेत. दहा वर्षांपूर्वी जपानमध्ये प्रवेश केलेल्या कॅब्रे संस्कृतीचे हे पुढचे पाऊल म्हणता येईल. जपानी गुंडम या अतिशय लोकप्रिय पारंपारिक पात्रावर या महिला रोबो आधारीत आहेत. खालचा भाग चाकांचा असलेल्या या रोबोच्या पायाशी खुर्ची आहे. त्या खुर्चीत बसून ग्राहक खाण्यापिण्यावर ताव मारू शकतातच पण या रोबोचे नियंत्रणही करू शकतात.

Leave a Comment