सोनाक्षीचे स्वप्न केले अक्षयने पूर्ण

गेल्या काही दिवसापासून सोनक्षी सिन्हा व अक्षयची जोडी पडद्यावर चांगलीच जमली आहे. त्यामुळेच सोनाक्षी आता अक्षयकुमारच्या होम प्रोडक्शनच्या ‘ओएमजीः ओह माय गॉड’ या सिनेमात आयटम सॉंगवर थिरकणार आहे. त्यासोबातच ती या सिनेमात एक छोटा रोल करणार आहे.

सोनाक्षीला या सिनेमाची स्क्रिप्ट आवडली असल्याने तिने या सिनेमात काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. तिची हि विश तिने अक्षयकुमारकडे व्यक्त केल्या नंतर त्याने लगेचच सिनेमात एक नव्याने रोल क्रिएट केला आहे. सूत्राने दिलील्या माहितीनुसार सोनाक्षीचा रोल असलेले शूट काही दिवसात करण्यात येणार आहे. सोनाचे हे स्वपन अक्किने पूर्ण केल्याने सध्या ती जाम खूष आहे.

या सिनेमामध्ये सोना ही अक्की सोबत दिसणार नाही. यापूर्वीच अक्षयचा रोल असलेल्या भागाचे शूट पूर्ण झाले आहे. सध्या अक्की ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई-२’ या सिनेमाच्या शूट साठी मिडल ईस्टला जाणार आहे. या सिनेमामध्ये सोनाक्षी परेश रावल सोबत दिसणार आहे. तेच या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत.

Leave a Comment