
फोन आणि टॅब्लेटचे कॉम्बिनेशन म्हणून फॅब्लेट असे नामकरण केलेल्या सॅमसंगच्या बहुप्रतिक्षित गॅलॅक्सी नोट टूचे जर्मनीतील बर्लिन येथे उद्या लॉचिंग केले जात असल्याचे वृत्त एका कोरियन वृत्तपत्राने दिले आहे आणि या नोटची कांही फिचर्सची लीक केली आहेत. गॅलॅक्सी नोटचे हे पुढचे अपग्रेडेड व्हर्जन बुधवारी आयएफए इंटरनॅशनल २०१२ या प्रदर्शनात लाँच होत आहे.