आता अननोन नंबरही ट्रेस करेल तुमचा मोबाइल!

स्टॉकहोम, २८ ऑगस्ट-अननोन नंबरवरून येणारे मिस्ड कॉल्स ही जरी सामान्य समस्या असली तरी तिच्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. कारण ही समस्या भविष्यात तुमची डोकेदुखी ठरू शकते.

बहुतेक महिला अननोन नंबरवरून येणार्‍या मिस्ड कॉल्समुळे त्रस्त असतात. परंतु आता हा अननोन नंबर ट्रेस करणे अगदी सोपे झाले आहे. वारंवार मिस्ड कॉल्स करणार्‍या अननोन नंबरचा छडा लावण्यासाठी स्वीडन येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने ’टू कॉलर’ नावाची अॅक अॅप्लिकेशन तयार केली आहे. ’टू कॉलर’च्या माध्यमातून तुमच्या मोबाइलवर आलेल्या मिस्ड कॉल कुणाचा? हे काही क्षणात आपल्याला कळू शकते. या कंपनीच्या डेटाबसमध्ये भारतातील सुमारे पाच ते आठ कोटी मोबाइल नंबर सुरक्षित करण्यात आले आहेत.

कसा कराल वापर?
’टू कॉलर’ या अॅप्लिकेशनला इंटरनेटवरून सहज डाउनलोड करता येते. सर्व मोबाइल युजर्स ही अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अॅप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ’एनहँस सर्च’ नावाचे फंक्शन सुरु होते. ’तुमच्या मोबाइलमधील कॉन्टॅक्ट नंबर सुरक्षित करण्यासाठी आम्ही ते सर्व्हरवर घेत आहे. त्याला तुमची अनुमती आहे काय?’ अशी तुम्हाला विचारणा करण्यात येते.

युजर्सने त्याला अनुमती दिल्यानंतर या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलमधील सर्व कॉन्टॅक्ट नंबर सुरक्षित होऊन जातात. तसेच तुमच्या मोबाइलवर आलेल्या अननोन नंबरची माहितीही सहच उपलब्ध होते. भारतात आतापर्यंत लाखो मोबाइलधारकांनी ’टू कॉलर’ अॅप्लिकेशन डाउनलोड केली आहे.