रिपब्लिकन पक्षाला हवी भारताशी मैत्री

वॉशिंग्टन: अमेरिकन अध्यक्षपदाच्या प्रचाराच्या रणधुमाळीत रिपब्लिकन पक्षाने भारताला अमेरिकेचा महत्वाचा साथीदार बनविण्याची घोषणा केली आहे. अमेरिकास्थित भारतीयांच्या सुरक्षेबाबतही पक्षाने आग्रही भूमिका घेतली आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा विषयक उपसमितीने भारताबाबत पक्षाच्या धोरणाचा मसूदा मंजूर केला आहे. रिपब्लिकन पक्ष जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताशी आर्थिक, सांस्कृतिक, राजनैतिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सहकार्य करू इच्छितो.

अमेरिकेच्या विकासात भारतीयांचे मोठे योगदान आहे. भारतीय नागरिकांना अमेरिकेत सुरक्षेची हमी मिळावी अशी पक्षाची सरकारकडे आग्रहाची मागणी आहे; असे रिपब्लिकन पक्षाने मसुद्यात म्हटले आहे.

Leave a Comment