दक्षिण अमेरिकेवर चक्रीवादळाचे सावट

वोशिंग्टन: हैती आणि क्युबा येथे विध्वंस केल्यानंतर आयझॅक वादळ आता अमेरिकेच्या दक्षिण भागाकडे सरकत आहे. लुइजियाना, मिसिसिपी, अलाबामा या ठिकाणी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

याआधी ७ वर्षापूर्वी लुइजियानामध्ये अशाच कटरीना या समुद्री चक्रीवादळाने न्यू ओर्लीनमध्ये हाहा:कार उडविला होता. त्यात १८०० लोकांचा बळी गेला होता. या चक्रीवादळामुळे फ्लोरिडाच्या दक्षिणेकडील भागात प्रचंड पाऊस आणि वेगवान वार्‍यांनी तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. आवश्यक बचावकार्यासाठी फेडरल गटाकडून मदत मिळावी म्हणून आपत्कालीन घोषणा करण्यात आली आहे. आयझॅक या चक्रीवादळाचे केंद्र फ्लोरिडाच्या पश्चिमेकडे २०० किमी दूर असलेल्या मेक्सिकोच्या खाडीत आहे. तरीही हे वादळ प्रचंड मोठे असून फ्लोरिडाचा जवळ जवळ अर्धा भाग वादळाच्या तडाख्यात सापडला आहे.

फ्लोरिडातील तेम्पा शहरात सोमवारी रिपब्लिकन पार्टीचे मोठे अधिवेशन होणार असून त्यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पार्टीचे उमेदवार मिट रोमनी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

मात्र या चक्रीवादळ संकटाचे सावट या अधिवेशनावर आहे. या संमेलनात पक्ष नेते बॉबी जिंदाल, निकी हेले व रिकी गिल उपस्थित राहणार आहेत इथल्या इतिहासात भारतीय वंशाच्या नेत्यांना प्रथमच अधिवेशनासाठी बोलावले जात आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार पक्षाच्या नव्या कार्याक्रमची घोषणा लवकरच जाहीर केली जाईल. रोमनी आयोवा मध्ये असून हवामान खराब असल्यास ते संमेलनाला उपस्थित राहणार नाहीत. अशा वेळी लुइजियना चे गवर्नर बॉबी जिंदाल प्रमुख भाषण करतील. विशेष म्हणजे जिंदाल २००८ मधल्या संमेलनात गुस्ताव वादळामुळेच उपस्थित राहू शकले नव्हते.

Leave a Comment