हिरोइनमध्ये करीना करणार प्रीती झिंटाची कॉपी

बॉलीवूडमध्ये भांडणे व एकमेकाबदल असलेली तिरस्काराची भावना काही केल्या कमी होत नाही. इंडस्ट्रीजमधील ही भांडणे इमोशनल व काहीवेळा पर्सनलदेखील असतात. त्यामुळेच मधूर भांडारकरच्या बहुचर्चित ‘हिरोईन’ या सिनेमामध्ये करीना कपूर आता तिची सहकारी अभिनेत्री असलेल्या प्रीती झिंटाच्या काही आयडियाची कॉपी करताना दिसणार आहे. तिच्या रियाल लाईफ मधील काही आयडिया या सिनेमाच्या मध्यमातून जशाच्या तशा ती पडद्यावर सादर करणार आहे .

गेल्या वर्षीच प्रीती व करीनाने यापूर्वीचे सर्व मतभेद विसरून एकत्रित आल्या होत्या. प्रीतीने ‘बॉडीगार्ड’ मधील करीनाच्या कामाचे मुक्तपणे कौतुक केले होते. सोशल नेटवर्किंग साईट वर करीनाच्या स्कीलचे तोंड भरून कौतुक केले होते. त्यानंतर करीनाने देखील प्रीतीच्या स्वीट आणि जेनियन नेचरची प्रशंसा केली होती.

रियल लाईफमध्ये प्रीती झिंटा स्वताचा सिनेमा पाहन्यासाठी बुरखा घालून जात होती. हे मधुरला समजल्यानंतर त्याने हा सीन ‘हिरोइन’ सिनेमात घेतला आहे. त्याची कॉपी करीनाने या सिनेमात हुबेहुब केली आहे. त्यामुळे करीनाने केलेली ही कॉपी आता प्रीतीला आवडणार की नाही येत्या काही दिवसात समजेल. त्यामुळे या दोघातील रिलेशन पुन्हा कसे राहणार हे ‘हिरोइन’ सिनेमा रिलीज झाल्यानंतरच समजेल.

Leave a Comment