भारतच विश्वजेता

कर्णधार उन्मुक्त चंदच्या १११ धावाच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रोमहर्षक लढतीत १९ वर्षाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात करीत विश्वजेतेपद पटकाविले. भारतीय संघाच्या विजयचा शिल्पकार हा कर्णधार उन्मुक्त चंद हाच ठरला. १९ वर्षाखालील भारतीय संघाने दमदार खेळी करीत विश्वजेतेपदाची हॉटट्रिक साधली आहे.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ५० षटकात आठ गडी बाद २२५ धावचे आव्हान उभे केले होते. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती केवळ ३८ धावात ४ गडी बाद झाले होते. मात्र बस्सीटोने ८७ धावाची खेळी केली त्याला टनने ४३ धावा करीत साथ दिली. या दोघाच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला सन्मानजनक धावसंख्या उभा करता आली. भारताकडून संदीप शर्माने चार बळी घेतले तर रविकांत व अपराजीतने एक-एक बळी मिळविला आहे.

२२५ धावाचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनकच झाली. सलामीवीर प्रशांत चोप्रा लवकर बाद झाल्यानंतर बाबा अपराजितने दमदार फलंदाजीकरीत डाव सांभाळला. त्यानंतर कर्णधार उन्मुक्त चंद्रने दमदार फलंदाजी करताना भारताचा डाव सावरला ३७ ओवरमध्ये ४ बाद १४७ धावा केल्या होत्या शेवटच्या १३ षटकात विजयासाठी ७७ धावची आवश्यकता होती. कर्णधार उन्मुक्त चंद्रच्या १११ धावा व पटेलने दिलेली ६२ धावची साथ याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी व दोन ओवर राखून पराभव केला.

Leave a Comment