ऑपरेशन जेरोनिमोचे अंतरंग उलगडणार्‍या कमांडोवर दुहेरी दबाव

वॉशिंग्टन: अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठीच्या ऑपरेशनचे अंतरंग उलगडून दाखविणारे पुस्तक लिहिणार्‍या नेव्ही सील कमांडोला एकीकडून अल कायदाच्या धमक्या येत आहेत; तर दुसरीकडे अमेरिका प्रशासन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल का; याची चाचपणी करीत आहे.

मेट बायासोनेट या कमांडोने लादेनला मारण्यासाठी अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडो पथकाने केलेल्या ऑपरेशन जेरोनिमोवर नो ईझी डे: द फर्स्ट हेंद अकौंट ऑफ द मिशन देट किल्ड ओसामा बिन लादेन हे पुस्तक मार्क ओवन या टोपण नावाने लिहिले आहे. हे पुस्तक ११ सप्टेंबर रोजी प्रकाशित होत आहे.

अल कायदाने या कमांडोचे नाव आणि छायाचित्र वेबसाईटवर प्रदर्शित करून त्याला ‘हाच लादेनचा मारेकरी’ असे संबोधले आहे. त्याला मारण्याची धमकीही देण्यात येत आहे.

अमेरिकन सुरक्षा दलेही मेटच्या हात धुऊन मागे लागण्याची चिन्ह आहेत. अमेरिकेचे स्पेशल ऑपरेशन कमांडर अ‍ॅडमिरल बिल मेकारावन यांनी ई मेलद्वारे इशारा दिला आहे की; सैन्य दलाची संवेदनशील माहिती उघड करणे देशासाठी हानिकारक ठरू शकते. असे कृत्य करणार्यावर कायदेशीर कारवाईचा मार्ग खुला असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Comment