नवी दिल्ली:कोळसा खाण घोटाळा घडलेलाच नाही; असे सांगून काँग्रेस देशातील जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांनी केला. २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत असेच विधान करून तोंडघशी पडल्यानंतरही काँग्रेस आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यापासून कोणताही धडा घेतला नसल्याची टीकाही त्यांनी केली.
वाटप करण्यात आलेल्या कोळसा खाणीपैकी एकाच खाण सुरू असून इतर खाणीत कोळसा जमिनीतच आहे. मग घोटाळा होईलच कसा; असा सवाल चिदंबरम यांनी शुक्रवारी केला होता. त्यांच्या या विधानाचा जेटली यांनी समाचार घेतला.
असल्या पोकळ तर्काचा आधार घेऊन काँग्रेस आपला बचाव करू शकत नाही असे सांगून; एकदा कमी दरात खाणींचे वाटप केल्यावर सरकारने त्यात खोदाई करण्याचा अधिकार गमावला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.