अरुण शौरी यांचा भाजपला घरचा आहेर

चेन्नई: कोळसा खाण घोटाळा प्रकरणी संसदेचे कामकाज ठप्प करून विरोधकांच्या हाती काहीच पडणार नाही. त्यापेक्षा पंतप्रधानांना या प्रकरणी निवेदन करण्याची संधी दिले जाणे आवश्यक आहे; असे मत व्यक्त करून ज्येष्ठ पत्रकार आणि वाजपेयी सरकारमधील माजी दूरसंचार मंत्री अरुण जेटली यांनी भारतीय जनता पक्षाला घराचा आहेर दिला.

एका कार्यक्रमानिमित्त चेन्नई येथे आलेले शौरी पत्रकारांशी बोलत होते.

ज्या काळात कोळसा खाण घोटाळा घडला त्या काळात कोळसा मंत्रालय पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अधिपत्याखाली होते. त्यामुळे या प्रकरणी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणे आवश्यक आहे. भाजपला चर्चा घडवून आणण्यात कोणतीही हरकत नसावी. मात्र बहुतेक वेळा केवळ चर्चाच होते आणि प्रत्यक्ष कारवाई होत नाही. अनेक भ्रष्ट नेत्यांना असेच मोकळे सोडले जाते. त्यामुळे भाजप या प्रकरणी आक्रमक असावा; असे मत शौरी यांनी व्यक्त केले.

सलग पाच दिवस कोळसा खाण घोटाळा प्रकरणी संसदेचे काम बंद पडल्यावर हा निर्णय मागे घेण्यासाठी भाजपला काही तरी कारणही सापडायला हवे; अशा शब्दात त्यांनी पक्षाची अडचण व्यक्त केली. २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात भाजपने अशीच भूमिका घेऊन चिदंबरम यांना बहिष्कृत केले होते. मात्र काही कालावधीत सर्व काही सुरळीत होऊन चिदंबरम अजूनही मंत्री पदावर आहेत; याकडे शौरी यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment