
जम्मू: भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात आणखी काही भुयारे असल्याची शक्यता नाकारता येणार नाही; असे मत भारताचे गृह सचिव आर. के. सिंग यांनी व्यक्त केले.

जम्मू: भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात आणखी काही भुयारे असल्याची शक्यता नाकारता येणार नाही; असे मत भारताचे गृह सचिव आर. के. सिंग यांनी व्यक्त केले.
जम्मूमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सिंग जम्मूच्या दौर्यावर आले आहेत. यावेळी ते सीमा सुरक्षा दल, पोलीस स्थानिक प्रशासन, राज्य शासन आणि सैन्य दलाच्या अधिकार्यांबरोबर चर्चा करणार आहेत.
काही दिवसापूर्वी सीमेवर पाकिस्तानातून भारतीय हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात भुयार खणल्याचे आढळून आले आहे. घुसखोरीसाठी अशाच प्रकारे आणखी भुयारे खणली असल्याची शक्यता असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून घुसखोरांना संरक्षण देण्यासाठीच भारतीय सीमा सुरक्षा दलांवर गोळीबार केला जात असून ही बाब गंभीर असल्याचेही सिंग यांनी नमूद केले. पाकिस्तानमधून दि. ५ ओगस्टपासून सीमेवर तैनात असलेल्या जवानांवर गोळीबार केला जात आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबारामुळे सीमावर्ती भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे.